दाभिल माऊली देवस्थानचा आज वार्षिक जत्रोत्सव
12:05 PM Dec 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
जागृत देवस्थान अशी ख्याती
Advertisement
ओटवणे | प्रतिनिधी
दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माऊलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा खानोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच दाभिल ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement