नेरूर ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण
कलेश्वर देवस्थान उपसमितीच्या
कारभाराविरोधात लढा
सावंतवाडी : प्रतिनिधी
कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लगार उपसमिती, देऊळवाडा नेरूर यांच्या मनमानी कारभाराला पश्विम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर पाठीशी घालत असल्याचा आरोप करत नेरूर ग्रामस्थ, श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांनी सावंतवाडी येथील पश्विम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. गुरुवारी सकाळपासून १५ ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. ‘खयतरी पाणी मुरता... ते सगळा पाणी मुरता’ असा बॅनर उपोषणस्थळी लावण्यात आला असून हुकूमशाही, मनमानी आणि बेकायदेशीर पद्धत अवलंबल्याचा आरोप कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीवर करण्यात आला आहे. सुहास नारकर, आनंद नारकर, प्रसाद पोईपकर, जयवंत मेस्त्री, संजय मेस्त्री, सुरेंद्र घाडी, प्रथमेश मेस्त्री, नीलेश मेस्त्री, अनिकेत मेस्त्री, मनोज चव्हाण, आशिष नेरुरकर, विवेकानंद नेरुरकर, प्रथमेश नेरुरकर, भरत नेवगी, अमित नाईक आदी उपोषणाला बसले आहेत.