सिल्क स्मिता यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा
आधारित चित्रपटाची घोषणा- चित्रपटाचा प्रोमो जारी
दिवंगत अभिनेत्री विजयलक्ष्मी वदलापति उर्फ सिल्क स्मिता यांचा आगामी बायोपिक ‘सिल्क स्मिता-क्विन ऑफ द साउथ’ची घोषणा एका टीजरसोबत करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री चंद्रिका रवि मुख्य भूमिकेत असून ती 80 आणि 90 च्या दशकातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकाराची व्यक्तिरेखा साकारत आहे.
याच्या टीझरमध्ये भारतीय संगीतकार इलैयाराजा यांचे लोकप्रिय संगीत असून जे 1984 चा चित्रपट वाझकाईतील गाणे ‘मेला मेलला’चे आहे. या चित्रपटात सिल्क स्मिता यांनी अभिनय केला होता. घोषणेची झलक एका दृश्यातून होते, ज्यात इंदिरा गांधी सिल्क स्मिताच्या व्यापक मीडिया कव्हरेजला पाहत असल्याचे आणि अभिनेत्रीविषयी विचारपूस करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
सिल्क स्मिता यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत एक अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून लोकप्रियता मिळविली होती. मल्याळी, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. त्यांची कारकीर्द सुमारे दोन दशकांपर्यंत राहिली आणि त्यांच्या नावावर 400 हून अधिक चित्रपट नोंद आहेत.