For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी सरकारने दिलेल्या गॅरंटी योजनांची यादी जाहीर करा : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

10:48 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी सरकारने दिलेल्या गॅरंटी योजनांची यादी जाहीर करा   पालकमंत्री सतीश जारकीहोळी
Advertisement

बेळगाव : देशासाठी आणि देशातील जनतेसाठी मीच गॅरंटी म्हणून सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून किती गॅरंटी योजना दिल्या आहेत, याची यादी जाहीर करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेस सरकारच्या योजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये देशातील जनतेसाठी मीच गॅरंटी म्हणून सांगत आहेत. असे असले तरी जनतेसाठी किती गॅरंटी योजना दिल्या आहेत? याची यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. जनतेला गॅरंटी योजना देण्याबाबत विकासाच्या योजना राबवून मदत केली जात आहे. भाजपकडून विकास खुंटला असल्याचा खोटा आरोप केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

चिकोडी लोकसभा मतदार संघाबाबत ते म्हणाले, विद्यमान खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्याबाबत मतदारांमध्ये असंतोष आहे. प्रचारादरम्यान ही बाब आपल्या निदर्शनास आली आहे. आपण केवळ निवडणुकीदरम्यानच जनतेच्या संपर्कात न राहता सातत्याने संपर्कात असतो. आठवड्याला एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधतो, असे त्यांनी सांगितले. चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा उमेदवारी अर्ज चार-पाच जण मिळूनच सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांसह कार्यकर्ते, नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे सांगितले. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, राजेंद्र पाटील, राजदीप कौजलगी, परशराम ढगे, सिद्धक्की अंकलगी आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.