हिवाळी अधिवेशनात जातवार जनगणनेची घोषणा करा
कोल्हापूर :
सबका साथ, सबका विकास ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जातवार जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी ओबीसी बहुजन आघाडीने केली आहे. तहसीलदार स्वप्नील पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, 1931 पासून देशात जातवार जनगणना झाली नाही. देशात लोकसंख्येने सर्वात मोठा असलेला प्रवर्ग इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही राष्ट्रीय योजनांचे लाभ मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे ओबीसींची जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे.
जातनिहाय जनगणना झाल्याने समाजातील कुटुंबांचे, नागरिकांचे राहणीमान, दर्जा, शिक्षण, व्यवसाय, सरकारी नोकऱ्यातील प्रमाण, एकूण उत्पन्न यांची सखोल माहिती शासनाकडे उपलब्ध होईल. देशात ओबीसी समाजाची संख्या 52 टक्के आहे. एवढ्या मोठया लोकसंख्येला अपरिचित व मागास ठेवून देशाची प्रगती होणे अशक्य आहे. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जातवार जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. यावेळी चंद्रकांत कोवळे,एकनाथ कुंभार,अनिल खडके,विजय मांडरेकर,चंद्रकांत कांडेकरी उपस्थित होते.