अणसुर येथील समंध भवानी मंदिराचा वर्धापन दिन 9 जानेवारीला
05:32 PM Jan 07, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ला-
Advertisement
वेंगुर्ला तालुक्यात खालचे अणसुर येथील श्री देव मूळ पुरुष समंध भवानी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. या वर्धापन सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यामध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद आणि सायंकाळी भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचे नाटक संपन्न होणार आहे तरी सर्वांनी वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article