‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’मध्ये ऐनी हॅथवे
19 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. हॉलिवूडचा मोस्ट एंटीसिपेटेड कॉमेडी ड्रामा द डेव्हिल वियर्स प्राडाचा सीक्वेल येत असून याच्या फर्स्ट लुकने चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. डेव्हिल फ्रँकल यांनी हा चित्रपट तयार केला होता, ज्यात मेरिल स्ट्रीफ, ऐनी हॅथवे, स्टॅनली टुसी आणि एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.
‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ चित्रपटातील ऐनी हॅथवे आणि मेरिल स्ट्रीपचा लुक समोर आला आहे. याच्या टीझर ट्रेलरमध्ये ऐनी आणि मेरिल हे आकर्षक लुकमध्ये दिसून येत आहेत. टीझरमध्ये मिरांडा (मेरिल स्ट्रीप) आणि एंडी (ऐनी हॅथवे) यांची भेट लिफ्टमध्ये होत असल्याचे दिसून येते.
‘द डेव्हिल वियर्स प्राडा 2’ या चित्रपटाच्या टीझरसोबत प्रदर्शनाची तारीखही उघड करण्यात आल आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सीक्वेलमध्ये चारही कलाकारांची वापसी झाली आहे, परंतु नव्या कहाणीसोबत. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड फ्रँकल हेच करत आहेत.