कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब जोल्ले

02:48 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपाध्यक्षपदी राजू कागे : कार्यकर्त्यांतून जल्लोष : जिल्हा बँकेला राज्यात आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार - जोल्ले

Advertisement

बेळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर उभयंतांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. राजू कागे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

Advertisement

रविवार दि. 19 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक चुरशीने पार पडली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 7 जागांपैकी 3 जागांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. 4 जागांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. मात्र 2 नोव्हेंबर रोजी उर्वरित 4 जागांचा निकाल जाहीर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सर्व जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. तर काही दिवसापूर्वी सरकारचा नामनिर्देशक सदस्य पदाचीही निवड करण्यात आली. नामनिर्देशक सदस्यपदी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक काळात आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी लिंगायत समाजाला अध्यक्षपदासाठी प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अध्यक्षपदासाठी आण्णासाहेब जोल्ले हे प्रबळ दावेदार होते. मात्र उपाध्यक्ष पदासाठी कुतूहल निर्माण झाले होते. अंदाजाप्रमाणे अध्यक्षपदी आण्णासाहेब जोल्ले यांची निवड करण्यात आली. तर अनपेक्षितपणे उपाध्यक्षपदी आमदार राजू कागे यांची निवड झाली आहे. जारकीहोळी व जोल्ले गटाच्या संचालक मंडळाने चर्चा करूनच उपाध्यक्षपदी राजू कागे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणार

भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, बेळगाव जिल्हा बँकेला राज्यात आदर्श बनविण्यासाठी आण्णासाहेब जोल्ले व राजू कागे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करून सर्वसामान्य जनतेच्याही विकासाच्या दृष्टीने कार्यरत राहणार आहोत. राज्यात बेळगाव जिल्हा बँकेला अग्रस्थानी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी 30 महिन्यांनंतर अध्यक्ष बदलणार असल्याचे सुतोवाच केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, याबाबत आपल्याला माहिती नसली तरी आपण आगामी पाच वर्षात सर्वोत्कृष्ट प्रशासन देणार असून आपल्याला अध्यक्ष बदलण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आण्णासाहेब जोल्ले म्हणाले, सर्वजण मिळून बेळगाव जिल्हा बँकेची वाटचाल करणार आहोत. आगामी पाच वर्षात कार्य करून जिल्हा बँकेला राज्यात आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ठेवीधारक व पीकेपीएस यांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्याचे निवारणही करणार आहोत. सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार असून बेळगाव जिल्हा बँकेला आदर्शस्थानी पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. राजू कागे म्हणाले, यंदाच्या संचालक मंडळात आपणच वरिष्ठ आहोत. वरिष्ठ असलो तरी सर्वांना एकत्रित घेऊन बँकेची वाटचाल करणार आहोत. आपल्यावर विश्वास ठेवून आपली उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी पुढील पाच वर्षे कार्य करत राहणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article