Raju Shetty | राजकीय वस्तादांकडून अण्णांनी माहिती घ्यावी : राजू शेट्टी
राजू शेट्टींचा मुरलीधर मोहोळांवर जोरदार पलटवार
इचलकरंजी : मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून कसा चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी, असा पलटवार राजू शेट्टी यांनी केला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबर राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे
राजू शेट्टी म्हणाले की, मी नाव न घेताच एचएनजी बोर्डिंगच्या संदर्भात बक्तव्य केली आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केले. ते म्हणाले की, बिरेश्वर सोसायटी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्लेंच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यांच्या पत्नी आमदार आहेत. मुरलीधर अण्णा म्हणतात की मी राजीनामा दिला आहे. परंतु, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही, यासाठी त्यांनी राजीनामा दिला है हे माहित आहे, पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही.
तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी गोखले कंपनी आणि माझा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले. आमचा आणि मुरलीधर मोहोळ यांचे काही भांडण नाही, असेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.