महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनमोड मार्ग बंदमुळे रस्त्यावर शुकशुकाट

10:58 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/रामनगर

Advertisement

कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाटमार्ग चारचाकी वाहनांना वगळून इतर वाहनांना बंदचा आदेश दिल्यापासून अनमोड मार्गावरील रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. कर्नाटकातून गोवा राज्यात जाणाऱ्या काही बसेस आपल्या जबाबदारीवर धोका पत्करून अनमोड घाटमार्गे जात आहेत. परंतु आता हुबळी बस डेपो डीसीनेही रामनगर-जांबोटीमार्गे बसेसना गोवा राज्यात जाण्याचे बस धारकांना सांगितल्याने रामनगर-तिनेघाट-अनमोड भागातील बसप्रवास करता आला नाही. आता अनमोड मार्गावरील खड्डे भरण्यात आले आहेत. परंतु रस्ता बंद असल्याने याचा उपयोग फक्त चारचाकी वाहनांना होत आहे. काही खासगी बसेस, सरकारी बसेस या मार्गावरून येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सदर खासगी बसना अनमोड अबकारी चेकनाक्याहून पुन्हा परत पाठविण्यात येत आहे. आता चोर्ला मार्गावरही सतत वाहतूक ठप्प होत असल्याने अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने सर्वांना सोयीस्कर तसेच सुरळीत असलेला अनमोड मार्ग खुला करा, असे म्हणण्यात येत आहे. कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा अनमोड रस्त्याची पाहणी प्रांताधिकाऱ्याकांनी करून रस्ता योग्य असल्यास रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्याकडे राहिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article