अंकुर शाळेच्या विद्यार्थ्याचे पॅरास्वीमिंग स्पर्धेत यश
10:58 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : ‘अंकुर’ विशेष मुलांच्या शाळेचा विद्यार्थी मयंक हलदार याने पॅरास्वीमिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण तर 100 मी. बॅकस्ट्रोक व 100 मी. फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक मिळविले. बेंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मयंकने आपण केलेल्या मेहनतीच्या आधारे या स्पर्धेमध्ये यश मिळविले आहे. मागील सात वर्षांपासून तो अंकुर शाळेमध्ये शिक्षण घेत आहे.
Advertisement
Advertisement