महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंजली निंबाळकर यांच्या प्रचाराला शिरसीतून प्रारंभ

08:56 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची बैठक : बाजी मारण्याचा विश्वास

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निंबाळकर यांच्या लढतीची रूपरेषा आणि दिशा ठरविण्यासाठी कारवार जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक शिरसी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मंत्री मंकाळू वैद्य म्हणाले, जिल्ह्यात आजपासून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातील आठपैकी पाच आमदार काँग्रेसचे आहेत. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पाच गॅरंटीची अंमलबजावणी करून ‘बोले तैसा चाले’ हे सिद्ध करून दाखविले आहे. काँग्रेसने आणखी पाच गॅरंटीची घोषणा केली आहे. योजना घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. काँग्रेसने इतरांप्रमाणे खोटी आश्वासने दिली नाहीत. डॉ. निंबाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसने पहिल्यांदाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराला संधी दिली आहे. त्यामुळे डॉ. अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे सांगितले.

Advertisement

कार्यकर्त्यांनी मनात आणल्यास सर्व काही शक्य

आमदार सैल म्हणाले, कार्यकर्त्यांनी मनात आणल्यास सर्व काही शक्य आहे. आमदार भीमण्णा नाईक म्हणाले, मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आपण स्वत:च उमेदवार आहे. असे गृहीत धरून प्रचार कार्याला वाहून घेतल्यास बाजी आम्हीच मारू असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर म्हणाले, निंबाळकर मराठा समाजातील असून त्या पेशाने डॉक्टर आहेत.

एक कुटुंब म्हणून कार्य केल्यास विजय आमचाच

उमेदवार डॉ. निंबाळकर याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, राज्यात भाजपचे सरकार असताना आपण खानापूरच्या आमदार म्हणून सेवा बजावली आहे. आपण सर्वजण एक कुटुंब आहोत, अशी भावना ठेऊन कार्य केल्यास विजय आपलाच असेल. मी पण हिंदू आहे. तथापि आपण धर्म आधारित राजकारण करणार नाही, असे पुढे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हा पालकमंत्री आणि मच्छीमारी मंत्री मंकाळू वैद्य, प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे कारवारचे आमदार सतीश सैल, शिरसीचे आमदार भीमण्णा नाईक, उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेस शिस्त समितीचे सदस्य निवेदित अल्वा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकरसह जिल्हास्तरीय काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधी उमेदवाराला गांभीर्याने घ्या

जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे म्हणाले, काँग्रेस पक्ष जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करतो. एकाद्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मतदार आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या संबंध आणि संपर्कवार अवलंबून असते. यावेळी काँग्रेसतर्फे महिला उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे हेगडे यांना गांभीर्याने घ्या. यावेळी बाजी मारण्याचा विश्वास व्यक्त करून देशपांडे पुढे म्हणाले, पक्षश्रेष्ठी, राज्याचे वरिष्ठ नेते आणि सर्वांचे मार्गदर्शन घेऊन निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharatoffcial#tarunbharatSocialMedia
Next Article