For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनीत पड्डाला मिळाली मोठी संधी

06:08 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनीत पड्डाला मिळाली मोठी संधी
Advertisement

यशराज फिल्म्सने स्वत:च्या बॅनर अंतर्गत अनेक कलाकारांना पदार्पणाची संधी दिली आहे. यात रणवीर सिंह, अनुष्का शर्मापासून परिणीति चोप्रा आणि अर्जुन कपूरचे नाव सामील आहे. आता यशराज फिल्म्स लवकरच एका नव्या चेहऱ्याला मुख्य नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये सादर करणार आहे.

Advertisement

अनीत पड्डा हिला ही मोठी संधी मिळाली असून ती यापूर्वी बिग गर्ल्स डोन्ट क्राय या वेबसीरिजमध्ये दिसून आली आहे. ऑडिशन्सनंनतर यशराज फिल्म्समध्ये अनीतची एंट्री झाली आहे. तिला एका मोठ्या चित्रपटात भूमिका मिळाली आहे. अनीत अत्यंत गुणवान असून ती बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरेल असे यशराज फिल्म्सचे मानणे आहे. अनीत समवेत यशराज चार नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये आणणार आहे. या सर्वांना मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अनीत यापूर्वी सलाम वेंकी चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेत दिसून आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवती यांनी केली होती. तर काजोल आणि विशाल जेठवा यात मुख्य भूमिकेत होते. अनीत प•ा अनेक जाहिरातींमधूनही झळकली आहे. बिग गर्ल्स डोन्ट क्राय या वेबसीरिजमध्ये अनीत मुख्य भूमिकेत होती. या सीरिजमध्ये पुजा भट्ट, जोया हुसैन, मुकुल चड्ढा आणि राइमा सेन यांनीही मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.