प्राण्यांच्या आहाराची चव चाखण्याचा जॉब
जगातील सर्वात अजब नोकरी
जे लोक श्वान किंवा मांजरप्रेमी असतात ते स्वत:च्या पाळीव प्राण्यांवर प्रचंड प्रेम करतात. परंतु अनेकांना पाळीव प्राणी आवडत नाहीत. अशाच प्राण्यांच्या आहाराची चव चाखल्यावर लाखोंची कमाई होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? पाळीव श्वानांसाठीचे अन्न चाखल्यावर तुम्हाला पैसे मिळू शकतात. लोक याला जगातील सर्वात अजब नोकरी मानतात. या नोकरीसाठीचा पगार कळल्यावर तुम्हीही ती करण्यासाठी इच्छुक व्हाल
पाळीव प्राण्यांसाठी निर्मित आहाराची चव चाखावी लागणारी एक नोकरी आहे. या नोकरीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. याकरता पाळीव प्राण्यांच्या आहाराच्या न्यूट्रिएशन व्हॅल्यूचे आकलन करणे, त्याचा अहवाल तयार करणे, वर्तमान आहाराची गुणवत्ता सुधारण्यासाठी सूचना करणे इत्यादी कामे एका पेट फूड टेस्टरच्या नोकरीचा हिस्सा आहेत.
पेट फूड टेस्टर अखेर काय काम करतो असा प्रश्न विचारला जातो सर्वप्रथम त्याला भोजनाचा गंध घ्यावा लागतो. अनेक प्राणी हे अन्न खाण्यापूर्वी त्याला हुंगत असतात. याचबरोबर या प्राण्यांचे मालक स्वत:च्या घरांमध्ये अशी कुठलीही गोष्ट आणू इच्छित नाहीत ज्याचा गंध पूर्ण घरातील वातावरण बिघडवून टाकेल. हुंगून आहाराचे आकलन केल्यावर ते खावे लागते.
किती असतो पगार?
पेट फूड टेस्टर आहाराचा स्वाद, भोजनाचा आकार आणि स्मूथनेसची पडताळणी करतात आणि मग ते अन्न थुंकून टाकतात. प्राण्यांना कुठला स्वाद आणि गंध पसंत असतो हे टेस्टर्सना शिकविण्यात येते. ज्याप्रकारे माणूस खाण्यावरून टाळाटाळ करत असतो, तसेच प्राणीही करतात. आता जेव्हा काम अवघड आणि काहीसे विचित्र असल्याने त्याकरता पैसेही चांगले मिळतील हे निश्चित आहे. पेट फूड टेस्टरला वर्षाकाठी 20 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळत असतो.