हरियाणात मुख्यमंत्रिपदासाठी अनिल विज इच्छुक
वृत्तसंस्था/ अंबाला
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्याचे माजी गृहमंत्री आणि भाजप नेते अनिल विज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरच दावा सांगितला आहे. मी 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलो असून स्वत:च्या ज्येष्ठत्वाच्या बळावर पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी करतो. आजवर मी पक्षाकडून काहीच मागितले नाही, परंतु आता मागत असल्याचे त्यांनी म्हटले ओ.
भाजपने विज यांना अंबाला कँट मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. मी जर मुख्यमंत्री झालो तर हरियाणाचे चित्र अन् नशीब बदलून टाकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनिल विज यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हरियाणात यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी हे कार्यरत होते. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनी यांचे कौतुक केले आहे. हरियाणात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.