अनिल अंबरोळे आयबीबीएफच्या सदस्यपदी
बेळगाव : आयबीबीएफ संघटना बेळगावचे ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू व पंच अनिल अंबरोळे यांची आयबीबीएफ सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या 34 वर्षांपासून ते शरीरसौष्ठव क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात राष्ट्रीय पंचगिरी केली आहे अनिल अंबरोळे यांना आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी प्रमाणपत्र सुपूर्द केले. ते 1989-90 पासून मनपा व्यायाम शाळेत सराव करत होते. 1996 मध्ये जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धेत त्यांनी आपला सहभाग दर्शविला. राष्ट्रीय पंच म्हणून 2014 साली त्यांची निवड झाली तर 1996 पासून स्थापना झालेल्या बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेत कार्यरत असलेल्या अंबरोळी यांनी नुतन बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्ट्स या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मागील दीड वर्षांपासून मनपा व्यायाम शाळेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. राज्य अध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, महेश सातपुते, मिहीर पोतदार, राष्ट्रीय पंच राजेश लोहार, नारायण चौगुले व इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेळगांवच्या सर्व शरीरसौष्ठव खेळाडूंना एक राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण केले आहे.