Satara : दारू न दिल्याचा राग; ग्राहकाकडून हॉटेल चालकावर काचेच्या ग्लासने हल्ला
काशिळमध्ये बिअर बारमध्ये हाणामारी
सातारा : दारु दिली नाही म्हणून काशिळ (ता. सातारा) येथे बिअर बारमध्ये दि. ३० रोजी दुपारी २.३० वाजता हॉटेल व्यावसायिक शशिकांत महादेव घोरपडे (वय ५०) यास जगदीश हणंमत तळेकर (रा. काशिळ) याने काचेचा ग्लास डोक्यात मारुन जखमी केला. बिअर बारची तोडफोड केली म्हणून बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शशिकांत घोरपडे याच्या फिर्यादीनुसार काशिक येथे राज बिअरबारमध्ये जगदीश तळेकर हा आला. त्याने घोरपडे यास १०० रुपयाची दारु मागितली. त्यावर शशिकांतने १०० रुपयांची दारु येत नाही, २४० रुपयांची बटली आहे असे म्हटल्यावर जगदीशने शशिकांतला तुझ्या बापाचा बार आहे का?, तुझा बार फोडून टाकतो, असे म्हणत असताना त्यास शशिकांतने त्याला तू इथून बाहेर जा असे म्हणल्याच्या कारणावरुन चिडून टेबलवरील काचेचा ग्लास फरशीवर आपटला.
तेथील लोखंडी बाकडे पाडले. कॉऊंटरवरील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी हॉटेलमधील कामगारांनी जगदीशला धरुन हॉटेलबाहेर जा असे म्हणाले असता जगदीशने समाधान सर्जेराव मोहिते यास हाताने मारहाण करुन टेबलवरील काचेचा ग्लास शशिकांतच्या डोक्यात मारुन जखमी केले.