For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात अंगारकी संकष्टी उत्साहात

10:57 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात अंगारकी संकष्टी उत्साहात
Advertisement

2024 मध्ये एकमेव अंगारकी आल्याने भक्तांची गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी

Advertisement

वार्ताहर /किणये 

तालुक्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. अनेक गावागावांत् असलेल्या गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. या अंगारकी संकष्टीनिमित्त अभिषेक, पूजा-अर्चा व भजनाचे कार्यक्रम मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पाटील गल्ली पिरनवाडी येथील गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भक्त येत होते. मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मंदिरात भजन व पूजाविधी, विविध आध्यात्मिक कार्यक्रम झाले.

Advertisement

मच्छे गावातील गणेश मंदिरात दर्शनासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तसेच मच्छे येथील स्वामी नगरातील श्वेतार्क गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी श्वेतार्क गणेशमूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली. दिवसभर भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. तर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मार्कंडेयनगर येथील स्वयंभू वरद सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त सकाळी मूर्तीची विशेष पूजा शेट्टीगेरी यांनी केली. परिसरातील महिलांनी दिवसभर मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला. रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्रोदय पूजा व महाआरती करण्यात आली. सोनाली, बोकनुर, बेळगुंदी, रणकुंडये, किणये, ब्रम्हनगर आदी ठिकाणी असलेल्या गणपती मंदिरांमध्ये अंगारकी संकष्टीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. महिलांनी अंगारकी संकष्टीनिमित्त दिवसभर उपवास केला होता. तसेच गणरायाचे अगदी मनोभावे दर्शन घेतले. काही मंदिरांमध्ये सायंकाळी प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम झाले.

Advertisement
Tags :

.