For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी सेविका 3 महिन्यांपासून वेतनाविना

11:47 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी सेविका 3 महिन्यांपासून वेतनाविना
Advertisement

अंगणवाडी फेडरेशनची आज महिला-बालकल्याण खात्याला भेट

Advertisement

बेळगाव : मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे वेतन थकले आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रीही वेतनाविना काढावी लागली आहे. सेविकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आधीच महागाईने कहर केला आहे. त्यात वेतन थकल्याने अंगणवाडी सेविका हताश झाल्या आहेत. याबाबत अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनतर्फे मंगळवार दि. 15 रोजी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या सहसंचालकांची भेट घेऊन जाब विचारला जाणार आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये 7600 अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे.

या सर्व सेविकांना वेतनाविना रहावे लागले आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांचे संगोपन, गर्भवती महिलांना सकस आहार, कुपोषण निवारण, मतदार नोंदणी यासह इतर कामांचा ताण आहे. मात्र अंगणवाडी सेविकांचे वेतन थांबल्याने सेविकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना वेतन मिळालेले नाही. त्याबरोबर भाडोत्री असलेल्या अंगणवाडी इमारतींचे भाडेही थकले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव देखील वेतनाविना काढावा लागला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी वेतन मिळणार का? अशी चिंता अंगणवाडी सेविकांना लागली आहे.

Advertisement

अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनची आज खात्याला भेट 

अंगणवाडी सेविकांचे वेतन थकल्याने अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनतर्फे मंगळवार दि. 15 रोजी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याला भेट देऊन सहसंचालकांची चर्चा केली जाणार आहे. दरम्यान तातडीने वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.