महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाडीचे कामकाज सकाळच्या सत्रात

11:08 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाढत्या उष्म्याने वेळेत बदल : सकाळी 8 ते 12 पर्यंत भरणार

Advertisement

बेळगाव : वाढत्या उन्हामुळे महिला व बालकल्याण खात्याने अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हा बदल करण्यात आला आहे. दि. 8 एप्रिलपासून या नवीन वेळेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अंगणवाडी सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत भरत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. त्यामुळे अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत दि. 8 एप्रिल ते 10 मे पर्यंत सकाळच्या सत्रात अंगणवाडींचा किलबिलाट पहायला मिळत आहे. दि. 11 ते 26 मे दरम्यान उन्हाळी सुटी दिली जाणार आहे. 27 मे पासून अंगणवाड्या नेहमीप्रमाणे सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 यावेळेत भरविल्या जाणार आहेत. जिल्ह्यात 5 हजार 531 लहान-मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत. या सर्व अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उन्हाचा पारा 38 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत बालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

10 मे पर्यंत वेळेत बदल

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. 10 मे पर्यंत हा बदल राहणार आहे. सकाळी 8 ते 12 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांवर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- नागराज आर, सहसंचालक महिला व बालकल्याण खाते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article