For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश्वर ग्रॅनाईट स्पर्धेत अंगदराज हित्तलमनी मालिकावीर

12:07 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश्वर ग्रॅनाईट स्पर्धेत अंगदराज हित्तलमनी मालिकावीर
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना मैदानावर पार पडलेल्या सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा कर्णधार अंगदराज हितलमनी याने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेत फलंदाजी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत अंगदराज याने आपल्या संघाला प्ले ऑफमध्ये नेऊन ठेवले पण प्ले ऑफमध्ये पोतदार रॉयल्स संघ कमनशिबी ठरला.  त्यांना दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांना स्पर्धे बाहेर व्हावे लागले. अंगदराजने या स्पर्धेत एकूण 9 सामन्यात 258 धावा केल्या. तर 16 गडी बाद केले अंगदराजने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सरस कामगिरीचे प्रदर्शन करत या स्पर्धेत स्पर्धावीरचा बहुमान मिळवला. बक्षीस अविनाश पोतदार यांच्या हस्ते अंगदराज हितलमनी याला चषक देऊन गौरविण्यात आल

Advertisement

Advertisement
Tags :

.