For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनेवाडी-मोरघर रस्त्याची लागली वाट

01:19 PM Jun 30, 2025 IST | Radhika Patil
आनेवाडी मोरघर रस्त्याची लागली वाट
Advertisement

आनेवाडी :

Advertisement

जावळी तालुक्यातील आनेवाडी वाघेश्वर मार्गांवरील प्रमुख बाजापेठेचे गाव असलेल्या सायगावमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच संपूर्ण रस्त्यावरच रस्त्यात खड्डा कि खड्यात ररता शोधत परिसरातील ग्रामस्थांना वाट काढावी लागत आहे. या दुरावस्थेमुळे बाजारपेठेवर देखील परिणाम झाला असून व्यापारी वर्गासह पादचारी, ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. तीन चार महिन्यापूर्वीच झालेल्या कामाचा दर्जा किती चांगला आहे हे रस्त्याकडे पाहिले की समजू लागले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गेली अनेक वर्षे सायगावंकरांची या रस्त्यामुळे परवड होत आहे. सायगाव बाजारपेठेत व्यापारी वाहन चालक, महिला ग्रामस्थ ररत्याच्या दुरावस्थेने त्ररत होते. गेली वर्षेभर या रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे धुरळ्याने देखील व्यापारी वर्ग त्रस्त होता.

Advertisement

त्यात खड्ड्यांची भर, मात्र गेल्यावर्षी रस्त्याचे काम रडतखडत अखेर सबंधित ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र ते करताना कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन न केल्याने त्यांची फळे आताच्या पावसाळ्यात वाहनचालकांसहित स्थानिक व्याप्नयांना भोगावी लागत आहेत. मुख्य बाजारपेठेतच आता दीडशे ते दोनशे लहान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. एखादे मोठे वाहन भरधाव वेगाने गेल्यास आजूबाजूच्या दुकानात घरात, तसेच रस्त्याने चालण्प्रया पादचारी महिला, विद्यार्थी यांच्या अंगावर उडत आहे. ही परिस्थिती रोजचीच झाली असून अनेकदा टोकाची वादावादी देखील निर्माण होत आहे. सबंधित ठेकेदाराने केलेले काम देखील निकृष्ट असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. कारण रस्त्याच्या बाजूला बांधलेली गटरे देखील आता ढासळू लागली आहेत. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.

कायमच आमच्या गावची परिस्थिती या रस्त्यामुळे अडचणीची ठरत आहे. त्यामुळे सबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य पद्धतीने रस्त्याचे चांगले काम करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य चक्रपाणी कदम, दीपक घाडगे, हणमंत जकाती, किशोर देशमाने, संजय जेधे, संतोष यादव, राजेंद्र सोनटक्के, ज्ञानेश्वर जिमन टेलर, किरण गायकवाड, संजय मोरे, प्रकाश साबळे, योगेश जेधे, अमित जाधव, यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी केली आहे.

  • आतापर्यंत सायगावला कधीच चांगल्या प्रतीचा रोड झाला नाही

पाऊस नसेल त्यावेळी धुरळ्याचे साम्राज्य असते आणि त्यामुळे रोड लगत असण्प्रया घरांना व दुकानदारांना फार त्रास होतो. त्यातून दमा असणारे पण पेशंट वाढले आहेत. आणि दुकानातील चांगले चांगले साहित्य धुरळ्याने खराब होऊन नुकसान होत आहे. व्यवसायिकांनी लोन काढून दुकानाचे साहित्य भरले आहे. त्यामुळे तर दुकानदारांचे फारच नुकसान होत आहे आणि पावसाळ्यात ररत्यावर डबकी साचल्यामुळे दुकानदारांनी मांडलेला बाहेरच्या मालावर पाणी उडून अजून नुकसान होत आहे. रस्त्यावर चालणारे पादचारी यांच्यावर पण वाहनांनी वाहनांनी पाणी उडून त्यांच्यात वाद निर्माण होत आहेत.

                                                                                                                    - किशोर देशमाने, सामाजिक कार्यकर्ते

Advertisement
Tags :

.