Satara : अन् मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते दिव्यांगाची दिवाळी झाली गोड..!
दिव्यांग प्रेरणा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
सातारा : दिवाळीचा सण हा सर्वांसाठी आनंदाचा सण असतो. तो आनंदाने साजरा करता यावा याकरता दानशुर मंडळी जन्माने अंध, हातापायाने अधू झालेल्या दिव्यांगाना मदत करतात. दिव्यांगांप्रती एक प्रेमाची भावना म्हणून नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या दिव्यांगांना दिवाळी फराळ आणि कपड्यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता देण्यात आली. त्यामुळे दिवाळीचा आनंद दिव्यांगाचा द्विगुणीत झाला.
दिवाळीच्या सणाच्या दिवशी प्रत्येकाकडे एक उत्साह एक आनंद पहायला मिळतो. साताऱ्यात दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून अनेक दिव्यांग हे जोडले गेले आहेत. दिव्यांगांच्या सहभागी सुखदुखात होवून एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असते. या संस्थेतील दिव्यांगांना एक दिवाळीची आनंददायी भेट म्हणून नगरसेवक बाळासाहेब खंदारे हे दिवाळी फराळ आणि कपडे दिली असून त्यांची ही दिवाळी भेट राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते दिव्यांगांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, अमोल निकम, अमोल भातूसे, शैलेंद्र बोर्डे, शेलार यांच्यासह दिव्यांग बांधवांनी स्वीकार केला. यावेळी शिवेंद्रराजेंनी दिव्यांगांना सहकार्य करणार असे आश्वासन दिले. त्यामुळे दिव्यांग सामाजिक संस्थेच्या सर्व दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड झाली.
उपचार घेत असलेल्या दिव्यांग भगिनीला फराळ पोहचवला
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या सक्रीय सदस्या समिना शेख या आजारी असून त्या वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर घरीच असल्याने त्यांना हा दिवाळीचा फराळ घेवून दिव्यांग प्रेरणा समाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्यासह संस्थेचे सर्व कार्यकर्ते घरी पोहचून भेट दिल्याने ताजभाईंचे सहकार्य दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस व दिव्यांग बांधवांना मदत मिळवून देण्यामध्ये साताऱ्यातील ताज भाईचे मोलाचे कार्य करतात. कधीही कसलीही कुठेही प्रसिद्धी त्यांची अपेक्षा नसते. अनेकांना त्यांनी मदत मिळवून दिली असून त्यांच्याप्रतीही दिव्यांगांमध्ये आदराचे स्थान कायमचे आहे. समिना शेख यांच्यासह सर्व : कुटुंबियांच्या चेहऱ्यावर एक वेग आनंद पाहायला मिळाला.