महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...आणि गुकेशची झाली स्वप्नपूर्ती

06:17 AM Dec 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सिंगापूर

Advertisement

जगज्जेतेपद मिळणारा इतिहासातील सर्वात तऊण बुद्धिबळपटू ठरल्यानंतरचा दिवस भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशसाठी पूर्णपणे व्यस्त राहिला. रात्र जागविलेली असल्याने त्याचे डोळे जळत होते. तरीही गुकेश उत्साहाने भारलेला दिसला. जगज्जेतेपदाचा चषकाला स्वीकारण्यापूर्वी त्याने व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शेकडो जणांना ऑटोग्राफ दिले आणि यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील स्मितही कायम राहिले.

Advertisement

 

चेन्नईच्या या 18 वर्षीय तऊणाने गुऊवारी गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला. तो एकूण 18 वा आणि विश्वनाथन आनंदनंतर हा मुकुट जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे. या विजयाने त्याला 1.3 दशलक्ष डॉलर्सचे इनाम प्राप्त झाले आहे. शुक्रवारी सकाळी सुऊवात चषकाची झलक मिळून झाली, ज्याला त्याने स्पर्श करण्यास नकार दिला. कारण त्याला संध्याकाळी होण्राया समारोप समारंभापर्यंत थांबायचे होते. फिडेचे (इंटरनॅशनल चेस फेडरेशन) अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच यांनी त्याला प्रदान केल्यावर शेवटी त्याने तो चषक हातात धरला.

‘हा क्षण मी लाखो वेळा जगलो आहे असे वाटते. दररोज सकाळी जेव्हा मी उठत होतो तेव्हा हाच क्षण मला जाग येण्याचे कारण होते. हा चषक धरणे आणि हे वास्तव माझ्या आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाचे आहे’, असे सुवर्णपदक आणि 1.3 दशलक्ष डॉलर्सच्या बक्षिसासह चषक स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात गुकेशने सांगितले.

त्याआधी तो तऊण, ज्येष्ठ आणि अगदी लहान मुलांपर्यंतच्या चाहत्यांना भेटायला आणि त्यांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी बसला. रांगेत उभ्या असलेल्यांमध्ये केवळ भारतीयच नव्हे, तर स्थानिक सिंगापूरचे लोकही होते. त्यांनी बुद्धिबळाचे पट हातात घेतले होते. गुकेशने त्यावर ऑटोग्राफ दिल्यानंतर ते संस्मरणीय बनले.  झोपेअभावी डोळे जळत होते हे त्या तऊणाने कबूल केले, पण त्याला खूप छान वाटत असल्याचे देखील त्याने सांगितले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article