200 वर्षे जुन्या घरात मिळाला प्राचीन दगड
अजब होता आकार
एका 200 वर्षे जुन्या घरात एका व्यक्तीच्या हाती अजब दगड लागला. त्याचा आकार अत्यंत विचित्र होता. यामुळे या व्यक्तीने या दगडाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत त्याविषयी विचारणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका ग्रूपमध्ये युजरने या प्राचीन दगडाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये काळ्या रंगाचा सुमारे 8-9 इंच लांब दगड दिसून येतो. दगडाचा आकार अत्यंत अनोखा आणि अजब आहे.
पश्चिम न्यूयॉर्कच्या एका प्राचीन घरात हा दगड मिळाला होता, या घराची निर्मिती 1820 च्या आसपास झाली होती. हे घर न्यूयॉर्कच्या ईरी काउंटीमध्ये कोल्डेन नावाच्या भागात आहे.
संबंधित व्यक्तीच्या पोस्टनंतर या दगडाविषयी अनेक लोकांनी माहिती दिली आहे. दगडाने निर्मित ही कुऱ्हाड असल्याचे यातून समोर आले. अशाप्रकारची कुऱ्हाड 200-300 वर्षांपूर्वी वापरली जात होती. तर संबंधित घराच्या भिंतींची निर्मिती 1826 च्या आसपास झाली होती. तर काही लोकांनी हा स्टोन एक्स असल्याचे सांगत यासंबंधी संग्रहालय किंवा विद्यापीठाशी संपर्क साधावा असे सुचविले आहे. या स्टोनविषयी अधिक माहिती जमविली जातेय.