For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्समध्ये मिळाली प्राचीन अंगठी

06:51 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये मिळाली प्राचीन अंगठी
Advertisement

1800 वर्षे जुनी रोमन युगातील दागिना

Advertisement

फ्रान्सच्या ब्रिटनीनमध्ये पुरातत्वतज्ञांना 1800 वर्षे जुनी एक सोन्याची अंगठी मिळाली आहे. या अंगठीवर युद्धाची देवी व्हिनसचे चित्र कोरण्यात आले आहे.  ज्या ठिकाणी प्राचीन रोमन काळातील अंगठी मिळाली आहे, त्याच ठिकाणी मध्ययुगीन काळातील एका छोटया गावाचे अवशेष आढळून आले आहेत.

अंगठीसोबत कॅरोलिंगियन साम्राज्याच्या काळातील काही नाणीही मिळाली आहेत. हा शोध ब्रिटनीच्या पेस शहरानजीक लागला आहे. उत्खननात मिळालेली अंगठी आजही चांगल्या स्थितीत असल्याने तज्ञ चकित झाले आहेत. अंगठीवर व्हिनस द व्हिक्टोरियसचे नक्षीकाम आहे. प्राचीन रोमन युगातील अंगठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील मानली जात असून तेव्हा ब्रिटनी क्षेत्र रोमन साम्राज्याचा हिस्सा होते.

Advertisement

फ्रान्सच्या राष्ट्रीय निवारक पुरातत्व संशोधन संस्थेनुसार (आयएनआरएपी) ही अंगठी ‘असाधारण स्वरुपात संरक्षित’ अवस्थेत आहे. अंगठीत निकोलो नावाचे रत्न असून त्यावर नक्षीकाम करण्यात आले आहे.

ब्रिटनी गाव देखील सुमारे 1300 वर्षे जुने असू शकते. तेथे घरं, शेत, धान्यसाठ्यासाठी भूमिगत सोलिसचे अवशेष मिळाले आहेत. निकोलो एकप्रकारचा गोमेद दगड असतो, त्याला निळ्या रंगाचे आवरण वरच्या बाजूला येईल अशाप्रकारे त्याला कापले जाते. गावाला 10 व्या शतकातील वायकिंग युगादरम्यान सोडण्यात आले होते. गावात भांडी अन् जात्यासारखे अवजारही मिळाले आहेत. उत्खननाच्या ठिकाणी पुरातत्वतज्ञांना 9 व्या ते 10 व्या शतकातील नाणी मिळाली असून ती कॅरोलिंगियन साम्राज्याच्या काळातील आहेत.

Advertisement
Tags :

.