प्राचीन मानवाला होते शिंग
शतकांपासून माणसांच्या पूर्वजांविषयी माहिती मिळवत वैज्ञानिकांनी मानवी इतिहास शोधला आहे. हा इतिहास पूर्णपणे सर्वकाही सांगणाराही नाही. परंतु जुन्या काळातील मानवी सांगाडे मिळाल्यावर वैज्ञानिक स्वत:च्या माहितीत सुधारणा करत जातात. अनेकदा त्यांना चकित करणारे अवशेष मिळतात. अलिकडेच वैज्ञानिकांनी एका अशा कवटीचा शोध लावला आहे, जी मानवाची असली तरीही ती निएंडरथलची नाही, तर शिंगयुक्त कवटीने वैज्ञानिकांना कोड्यात पाडले आहे.
या जीवाश्माचा युरोपीय मानव विकासात एक महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ही कवटी 3 लाख वर्षांपूर्वी युरोपमध्ये निएंडरथलसोबत राहणाऱ्या होमो हाइडलबर्गेंसिस समुहाचा हिस्सा असू शकते असे तज्ञांचे मानणे आहे. ही अजब ‘एक शिंगयुक्त’ कवटी 1960 च्या दशकात ग्रीसच्या उत्तर क्षेत्रात पेट्रालोना गुहेच्या भिंतीत मिळाली होती. तांत्रिक प्रगती आणि पॅढल्साइटच्या मदतीने संशोधकांनी याच्या अस्तित्वाचा काळ आता 6 लाख ते 3 लाख वर्षापूर्वीचा असल्याचे निश्चित केले आहे. 
प्रौढ व्यक्तीची कवटी
वैज्ञानिकांनुसार होमो हाइडलर्बेंसिस नावाचा हा समूह आफ्रिकेत विकसित झाला होता आणि सुमारे 5 लाख वर्षांपूर्वी काही सदस्य युरोपमध्ये पोहोचले होते. अध्ययनाचे लेखक क्रिस स्ट्रिंगर हे लंडनच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियममध्ये पॅलियोएन्थ्रोपोलॉजिस्ट आहेत. हा व्यक्ती पुरुष होता असा अनुमान त्यांनी व्यक्त केला आहे. दातांच्या स्वरुपाच्या आधारावर याला युवा प्रौढ मानले गेले आहे. टीमने यूरेनियम सीरिज डेटिंगचा वापर करत याच्या वयाला अचूकपणे निश्चित केले आहे.
अधिक माहितीची आवश्यकता
हा शोध या ’यूनिकॉर्न पीपल’च्या अध्ययनात एक मैलाचा दगड आहे, जो पूर्वी होमो एरेक्टस, होमो निएंडरथॅलेन्सिस किंवा ‘आर्केइक होमो सेपियन्स’ यासारख्या विविध प्रजातींमध्ये सामील केला जात राहिला होता. सध्या अशाप्रकारच्या मानवाविषयी आणखी माहिती प्राप्त करण्याची गरज आहे आणि याचमुळे वैज्ञानिक निष्कर्षावर पोहोचण्याच्या घाईत नाहीत. हा शोध मानव विकासाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण अध्याय जोडतो, कारण हा नव्या शिंगयुक्त माणसाचा शोध आहे, हे प्रागैतिहासिक रहस्य आहे का या प्रश्नाचे उत्तर पुढील संशोधनातून मिळणार आहे.