मेक्सिकोच्या जंगलात मिळाले प्राचीन शहर
माया संस्कृतीशी संबंधित : घर अन् मंदिरांच्या 6674 संरचना
मेक्सिकोत युकाटन बेटावर 1500 वर्षे जुन्या माया संस्कृतीच्या एका विशाल शहराचा शोध लागला आहे. हा शोध खास प्रकारच्या लेजर सर्व्हे (लिडर तंत्रज्ञान)द्वारे लावण्यात आला आहे. एंटिक्विटी या नियतकालिकाने हे नवे संशोधन प्रकाशित केले आहे. शोधण्यात आलेल्या शहरात 6674 संरचना आहेत. यात चिचेन इट्जा आणि टिकाल सारखे पिरॅमिड सामील आहे. संशोधकांनी 1500 वर्षे जुन्या स्थळी स्वत:च्या शोधासाठी लिडार मॅप्सचा वापर केला, जे जमिनीवर लेझर पल्स शूट करून तयार केले जातात.
लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राचीन वसाहतींच्या अवशेषांच्या शोधात अत्यंत वेगवान वृद्धी झाली आहे. परंतु हे एक अत्यंत महागडे तंत्रज्ञान आहे. एरिझोना विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ आणि अध्ययनाचे पहिले लेखक ल्यूक औल्ड-थॉमस यांनी माझ्यासारख्या अनेक वैज्ञानिकांसाठी हे तंत्रज्ञान प्रारंभी उपलब्ध नव्हते असे सांगितले. लिडार सर्वेक्षणामुळे या क्षेत्रात संशोधनास मोठी मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
महामार्गांच्या आत शहराच्या खुणा
थॉमस यांनी पूर्वीच कमिशन करण्यात आलेल्या लिडार अध्ययनांना पडताळून मेक्सिकोच्या जंगलांमध्ये कार्बन मापन आणि देखरेखीसाठी तयार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा वापर केला. मेक्सिकोच्या पूर्व-मध्य कॅम्पेचेमध्ये 50 चौरस मैल क्षेत्राचे विश्लेषण केले, जेथे पूर्वी कधीच माया संरचनांचा शोध करण्यात आला नव्हता. यादरम्यान थॉमस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतजमीन आणि महामार्गांच्या दडलेल्या माया शहराच्या खुणा शोधून काढल्या आहेत.
संशोधकांनी या शहराचे नाव नजीकच्या गोड पाण्याच्या लॅगूनच्या नावावर वेलेरियाना ठेवले ओ. हे शहर 205-900 सालादरम्यानचे आहे. यात क्लासिक माया राजधानीची सर्व लक्षणे दिसून येतात. यात एक मोठा मार्ग, मंदिर, पिरॅमिड आ0िण एका बॉल कोर्टशी निगडित प्लाझा सामील आहे. वेलेरियाना शहराच्या केंद्रापासून दूर पर्वतावर घरं आहेत. जी एका घनदाट शहरी फैलावाचा संकेत देतात असे संशोधकांचे सांगणे आहे.
अशाप्रकारचे पहिलेच संशोधन
पूर्व-मध्य कॅम्पेचेमध्ये माया संरचनांना प्रकट करणारे हे पहिलेच संशोधन आहे. याविषयी वैज्ञानिक समुदायाला माहिती नव्हते. आम्ही अद्याप सर्वकाही शोधून काढलेले नाही. अद्याप बरेच काही शोधणे बाकी आहे. संशोधनात पुढील पाऊल पुरातत्वतज्ञांसाठी स्थळावर शहराची पुष्टी करणे आहे. यावर संशोधक पाऊल उचलू शकतात असे थॉमस यांचे सांगणे आहे.