For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनन्याने पूर्ण केले ‘कॉल मी बे’चे चित्रिकरण

06:56 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
अनन्याने पूर्ण केले ‘कॉल मी बे’चे चित्रिकरण
Advertisement

छायाचित्र शेअर करत व्यक्त केला आनंद

Advertisement

स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर अनन्याला अद्याप स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही. ‘पति पत्नी और वो’, ‘गहराइयां’ आणि ‘ड्रीम गर्ल2’ या चित्रपटांमध्ये काम केल्यावर अनन्याने आता ओटीटी जगतात पाऊल ठेवले आहे. करण जौहरचा शो ‘कॉल मी बे’द्वारे ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीने याच्या पहिल्या सीझनचे चित्रिकरण संपविले आहे. अनन्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.

अनन्याने पहिल्या सीझनचे चित्रिकरण पूर्ण झाल्याचा आनंद केक कापून व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर केकचे छायाचित्र शेअर करत ‘आतापर्यंतचा सर्वात खास’ अशी कॅप्शन दिली आहे. कॉल मी बे च्या पहिल्या सीझनचे चित्रिकरण 55 दिवसांपर्यंत चालले आहे. या शोमध्ये अनन्यासोबत वरुण धवन, नीलम कोठारी, वीर दास आणि सिद्धार्थ भारद्वाज यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा शो एका अब्जाधीश फॅशनिस्टाच्या संघर्षावर आधारित आहे.

Advertisement

अनन्या यापूर्वी आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. अनन्या आता कॉल मी बे या सीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचबरोबर तिच्याकडे जोया अख्तरचा चित्रपट ‘खो गए हम कहां’ देखील असून यात ती सिर्द्धंत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.