आनंदा, पालेकर संघांची विजयी सलामी
संजीवनी फाऊंडेशन क्रिकेट चषक स्पर्धा : सामनावीर शिवानंद, श्लोक याचा गौरव
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमी आयोजित संजीवनी फाउंडेशन चषक 11 वर्षाखाली आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी आनंद क्रिकेट अकादमीने के. आर. शेट्टी लायाज संघाचा तर प्रमोद पालेकर अकादमीने रॉजर क्रिकेट क्लबचा पराभव करून विजयी सलामी दिली. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संजीवनी फाउंडेशनच्या सविता बिगीनाळ, साईराजचे महेश फगरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, साईश धोंड, दीपक पवार, बाळकृष्ण पाटील, विठ्ठल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमोद पालेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
त्यात शिवनिश यळ्ळूरकरने 15 चौकारांसह 96 धावा, वहाद अहमदने 6 चौकारासह 57 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे आऊश शेट्टीने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 23.5 सर्व गडी बाद 98 धावा केल्या. त्यात सुनील पाटीलने 14, साईने 13 धावा केल्या. प्रमोद पालेकरतर्फे श्लोक सरनाईकने 20 धावात 4 तर शहाण मंडळने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल प्रमोद पालेकर अकादमीने 16.2 षटकात 2 गडी बाद 99 धावा करून सामना 8 गड्यानी जिंकला. त्यात शहाणने 7 चौकारांसह नाबाद 34, अनुपने नाबाद 20 धावा केल्या. रॉजरतर्फे सुनील पाटीलने 2 गडी बाद केले.