महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आनंद अकादमी, लायाज विजयी

10:13 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करडी चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित करडी चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेलया सामन्यातून आनंद क्रिकेट अकादमीने बीएससीचा तर लायाज क्रिकेट अकादमीने टिळकवाडी क्रिकेट अकादमीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्वयम खोत-लायाज, स्कंद शेट्टी-आनंद यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 2 गडीबाद 148 धावा केल्या. त्यात स्कंद शेट्टीने 8 चौकारासह नाबाद 62, हैदरअली सय्यदने 6 चौकारासह 39, अथर्व करडीने 2 चौकारासह 25 धावा केल्या. बीएससीतर्फे अवनीशने 1 गडीबाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना बीएससीने 25 षटकांत 5 गडीबाद 142 धावाच केल्या. त्यात सचिन टी.ने 4 चौकारासह 40, लक्ष्य खतायतने 2 चौकारासह 37 धावा केल्या. आनंदतर्फे अवनिश चव्हाणने 2 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट क्लबने प्रथम फंलदाजी करताना 23.3 षटकात सर्व गडीबाद 86 धावा केल्या. त्यात सिद्धार्थ हेडाने 1 षटकार व 5 चौकारासह 32 धवा केल्या. लायाजतर्फे सिद्धार्थने 15 धावांत 3, रंजीतने 2 गडीबाद केला.  प्रत्युतरादाखल खेळताना लायाज क्रिकेट अकादमीने 17.2 षटकात 3 गडीबाद 87 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम खोतने 5 चौकारासह 32, वेंदात बिजलने 2 चौकारासह 22 धावा केल्या. टिळकवाडी तर्फे देवेश हेडाने 20 धावात 2 गडीबाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article