कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनाहत-जोश्ना, अभय-सेंथिलकुमार उपांत्य फेरीत

06:06 AM Jun 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ जोहोर, मलेशिया

Advertisement

येथे सुरू असलेल्या आशियाई स्क्वॅश दुहेरी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अनाहत सिंग व जोश्ना चिन्नप्पा यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले. 2024 या मोसमात सर्वोत्तम चॅलेंजर खेळाडूचा बहुमान मिळविणारी अनाहत सिंग व तिची जोडीदार जोश्ना चिन्नप्पा यांनी शानदार खेळ करीत फिलिपिन्सच्या जेमीका अरिबादो व वायव्होन अॅलीसा दलिदा यांच्यावर 2-0 (11-6, 11-3) अशी मात केली. केवळ 12 मिनिटांत त्यांनी हा सामना संपवला. महिलांच्या अन्य दुहेरीच्या लढतीत पूजा अर्थी रघू व रथिका सीलन यांनी सिंगापूरच्या विकी युइ यिंग लाय व ग्रेसिया चुआ रुइ एन यांचा 11-8, 11-9 असा पराभव केला. पण नंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांना मलेशियाच्या आयना अमानी व यी झिन यिंग यांच्याकडून 11-7, 11-8 असा पराभव स्वीकारावा लागला. आता पाच ते आठ या स्थानासाठी त्यांच्या लढती होतील.

Advertisement

पुरुषांच्या दुहेरीत विद्यमान विजेते अभय सिंग व वेलावन सेंथिलकुमार यांनी संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी कोरियाच्या मिनवू ली व जूयों ना यांच्यावर 2-1 (10-11, 11-3, 11-5) असा विजय मिळविला. रवी दीक्षित व सेंथिलकुमार यांना मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. गट क मधील सामन्यात या जोडीला हाँगकाँगच्या चेयुक नाम लाय व वायलोक टो यांच्याकडून 6-11, 8-11 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 9 ते 16 व्या स्थानासाठी झालेल्या लढतीतही त्यांना सिंगापूरच्या बून वी एडवडं थांग व यू सिंग तिमोथी लिआँग यांच्याकडून हार पत्करावी लागली.

दरम्यान, मिश्र दुहेरीत भारताच्या दोन्ही जोड्यांना पहिल्या फेरीत बाय मिळाल्याने ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अनाहत सिंग-अभय सिंग या अग्रमानांकित जोडीची उपांत्यपूर्व लढत फिलिपिन्सच्या जेमीका अरिबादो व डेव्हिड विल्यम पेलिनो यांच्याशी होईल तर जोश्ना चिन्नप्पा-सेंथिलकुमार यांची लढत मलेशियाच्या आयरा अझमन व जोआकि चुआह यांच्याशी होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article