रत्नागिरीत पानवल गावात एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडली
04:17 PM Sep 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Advertisement
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पानवल घवाळीवाडी बस उतारामध्ये चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कलंडली. सोमवारी सकाळी हा अपघात घडला. रस्त्याच्या खाली असलेल्या रेशन दुकानात लगत ही दुर्घटना घडली. परंतु झाडीमुळे ही बस अडकून राहिली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. बस मध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला. चालक, वाहक सुदैवाने बचावले, त्यावेळी ग्रामस्थही मदतीला धावून गेले होते.
Advertisement
Advertisement
Next Article