कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑक्सिजनशिवाय जिवंत राहणारा जीव

06:56 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेल्मन फिशशी आहे कनेक्शन

Advertisement

जगण्यासाठी माणसांना आणि प्राण्यांना ऑक्सिजनची गरज भासते. ते ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. याचमुळे याला प्राणवायू देखील म्हटले जाते. ऑक्सिजन नसल्यास माणूस काही मिनिटांमध्ये मृत्युमुखी पडतो. परंतु जगात एक असा जीव आहे, जो ऑक्सिजनशिवाय अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.

Advertisement

वैज्ञानिकांनी एका अशा जीवाचा शोध लावला आहे, जो ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकतो. या जीवाचे नाव हेनेगुया साल्मिनिकोला असून याचा संबंध मिक्सोस्पोरिया ग्रूपशी असतो.

या जीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज नाही, हा प्राणवायूशिवाय जिवंत राहू शकतो. परंतु हा सेल्मन माशाच्या आत आढळून येतो. या जीवाचा शोध लावल्यावर वैज्ञानिक देखील दंग झाले आहेत. या परजीवीचा शोध इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे.

या जीवाला ऑक्सिजनची गरज भासत नाही, कारण यात मायटोकांड्रिया नसतो, जो पेशींच्या ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असतो. हा परजीवी स्वत:ची ऊर्जा माशापासून प्राप्त करतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे, परंतु हा हा प्रकार कसा करतो यावर अद्याप संशोधन सुरू आहे. जोपर्यंत मासा जिवंत राहतो, हा जीव जिवंत राहतो. परंतु हा परजीवी माणसांसाठी धोकादायक नाही.

Advertisement
Next Article