महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुहेतील पाण्यात मिळाला जुना ब्रिज

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पेनमध्ये लागला अनोखा शोध

Advertisement

स्पेनमध्ये मालोर्का नावाचे एक बेट आहे. येथील एका गुहेत पाण्यात बुडालेला ब्रिज मिळाला आहे. हा ब्रिज 5600 वर्षे जुना आहे. यामुळे या गुहेत प्राचीन काळात लोकांचे वास्तव्य होते हे स्पष्ट झाले आहे. कालौघात तापमान वाढत गेल्याने समुद्राची पातळी वाढली आणि हे ठिकाण पाण्यात बुडाल्याचेही समोर आले आहे. भविष्यात अशाचप्रकारे अनेक शहरे पाण्यात बुडालेली असणार आहेत. ही गुहा प्रत्यक्षात 2000 साली शोधण्यात आली होती. त्यानंतर वैज्ञानिकांना या गुहेत पाणी भरल्याचे दिसून आले होते. स्कूबा डायव्हिंग करत पाण्याखालील ब्रिज शोधण्यात आला आहे. ही गुहा भूमध्यसमुद्रानजीक आहे. यात लाइमस्टोन म्हणजेच चुनादगडाने निर्मित 25 फूट लांब ब्रिज आहे.

Advertisement

पूर्वी हा ब्रिज 4400 वर्षे जुना असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडाचे जियोलॉजिस्ट बोगडान ओनैक यांनी मागील अध्ययनात सांगण्यात आलेले बय हे या ब्रिजच्या आसपास मिळालेल्या भांड्यांच्या तुकड्यांवर आधारित होते, परंतु आता आम्हाला याचे अचूक वय कळले असल्याचे म्हटले आहे. या गुहेत एका खास बकरीची हाडं मिळाली आहेत. ब्रिजनजीक गोट-एंटीलोप मायोट्रागस बॅलेरिकसची हाडं मिळाली आहेत. बकऱ्याची ही प्रजाती आता विलुप्त झाली आहे. माणसांनी या गुहे कसा कब्ज केला होता हे अद्याप समजलेले नाही. कारण मलोर्का बेट अत्यंत मोठे आहे. भूमध्य समुद्रात माणसांनी येथे खूप आधी राहण्यास सुरुवात केली होती. सायप्रस आणि क्रीटेमध्ये 9 हजार वर्षांपूर्वी माणसांचे वास्तव्य सुरू झाले होते.

ब्रिजवरील रंगीत पट्ट्यांचे अध्ययन

बकरीची हाडं आणि ब्रिजमध्ये निर्माण करण्यात आलेल्या विविध रंगांच्या पट्ट्यांचे अध्ययन करण्यात आले आहे, कारण समुद्रात पडलेल्या गोष्टींवर वेगवेगळ्या रंगाचे आवरण जमा होत असते, ज्याला कॅल्साइट इनक्रस्टेशन म्हटले जाते, एकप्रकारचे हे कॅल्शियमचे आवरण असते. याची तपासणी करण्यात आली असता ब्रिजचे अचूक वय समजू शकले आहे. हा ब्रिज या गुहेच्या आत सुमारे 5600 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. भूमध्य समुद्र आणि पश्चिम भूमध्यसमुद्रातील अंतर संपविण्यासाठी हा ब्रिज तयार करण्यात आला होता. त्या काळातील लोक या गुहेद्वारे सागराच्या एका हिस्स्यातून दुसऱ्या हिस्स्याच्या दिशेने ये-जा करत होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article