सापांसाठी ओळखले जाणारे बेट
येथून जिवंत परतणे अवघड
आमच्या आसपास अशा अनेक जागा आहेत, ज्या रोमांच, रहस्य आणि आश्चर्यकारक गोष्टींनी व्यापलेल्या आहेत. काही ठिकाणी माणूस जात असतो, तर काही ठिकाणी जाणे माणसाला भीतीदायक वाटत असते.
जगात सापाला सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानले जाते. कारण अनेक साप इतके धोकादायक असतात की त्यांचा एक दंशच माणसाच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो. ब्राझीलमध्ये स्नेक आयलँड नावाचे एक ठिकाण आहे. प्रत्यक्षात या बेटाचे मूळ नाव ‘इलाहा दा क्यूइमादा’ आहे. या बेटाला पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत असतात. परंतु हे लोक बेटाच्या आत शिरणे टाळतात.
जगातील सर्वात धोकादायक साप याच इलाहा दा क्यूइमादा बेटावर आढळून येतात. स्नेक आयलँडवर वायपर प्रजातीचे साप देखील दिसून येतात. या प्रजातीच्या सापांमध्ये उडण्याची क्षमता देखील असते. या सापांचे विष इतके जहाल की असते, मानवी शरीरातील स्नायूच नष्ट करतात.
या बेटावर वेगवेगवेळ्या प्रजातीचे 4 हजाराहून अधिक साप आहेत. ब्राझिलियन नौदलाने सर्वसामान्य माणसांच्या येथील प्रवेशावर बंदी घातली आहे. स्नेक आयलँडवर केवळ सापाशी निगडित तज्ञांनाच संशोधनासाठी जाण्याची अनुमती आहे. परंतु ते देखील अनेकदा केवळ किनारी भागातच संशोधन करून परतत असतात.
काही शिकारी देखील या बेटावर जात अवैध स्वरुपात सापांना पकडतात आणि त्यांची विक्री करतात. येथे आढळून येणाऱ्या गोल्डन लान्सहेड वायपर सापाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 18 लाख रुपये इतकी आहे. या सापांच्या विषाचा वापर विविध कारणासाठी केला जात असतो.