For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंडनमध्ये दुर्घटनेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

06:22 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंडनमध्ये दुर्घटनेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू
Advertisement

सायकलने घरी जाणाऱ्या चाइस्ताने गमाविला जीव

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

लंडनमध्ये 33 वर्षीय भारतीय नागरिक चेइस्ता कोचरचा रस्ते अपघातात मृत्यू  झाला आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पीएचडी करत असलेली चाइस्ता सायकलने स्वत:च्या घरी जात असल्याने तिला एका ट्रकने धडक दिली होती. चेइस्ताचे पती तिच्यापासून काही अंतरावर असताना ही दुर्घटना घडली आहे. तिचे पती प्रशांत हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत.

Advertisement

नीति आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी चेइस्ताच्या मृत्यूची माहिती दिली आहे. चेइस्ताने नीति आयोगाच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. दुर्घटनेनंतर चेइस्ताचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. मागील वर्षीच चेइस्ता विवाहबद्ध झाली होती. दुर्घटनेप्रकरणी ट्रकचालकाने तपासात सहकार्य केले असल्याचे समोर आले आहे.

उत्तरप्रदेशच्या बरेली येथे राहणारी चेइस्ता ही पीएचडी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात लंडनमध्ये दाखल झाली होती. त्यापूर्वी तिने नीति आयोग आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनमध्ये काम केले होते. दिल्ली विद्यापीठ, शिकागो आणि पेंसिल्वेनिया विद्यापीठात तिने अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले होते.

Advertisement
Tags :

.