For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत भारतीयाला पाच वर्षांची शिक्षा

06:25 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत भारतीयाला पाच वर्षांची शिक्षा
Advertisement

ड्रग्ज तस्करीतून कोट्यावधींची कमाई अंगलट : ब्रिटनपर्यंत नेटवर्क

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

बनमीत सिंग हा अमेरिकेतील 40 वषीय भारतीय नागरिक डार्क वेबवर ड्रग्ज विकल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्याच्याकडून 1.25 हजार कोटी रुपये घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. बनमीत हा हल्द्वानी येथील रहिवासी आहे. एप्रिल 2019 मध्ये त्याला लंडनमधून अटक करण्यात आली होती. यानंतर मार्च 2023 मध्ये त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीमध्ये त्याने यावषी जानेवारी महिन्यात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

Advertisement

बनमीतने डार्क वेबवर मार्केटिंग साईट्स तयार केल्या होत्या. सिल्क रोड, अल्फा बे, हंसा अशी त्यांची नावे होती. येथे तो फेंटॅनील, एलएसडी, एक्स्टसी, केटामाईन आणि ट्रामाडोल यांसह इतर अमली पदार्थ विकायचा. हे ड्रग्ज खरेदी करणारे ग्राहक क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे अदा करत असत. यानंतर बनमीतने स्वत: ड्रग्जच्या शिपिंगची जबाबदारी घेतली. तो अमेरिकन मेल किंवा इतर सेवांद्वारे युरोपमधून अमेरिकेत ड्रग्ज पोहोचवत असे.

2012 ते जुलै 2017 दरम्यान बनमीतची अमेरिकेत ड्रग्ज विक्रीसाठी 8 केंद्रे होती. हे सर्व ओहायो, फ्लोरिडा, मेरीलँड, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन आदी महत्त्वाच्या ठिकाणी होती. येथे उपस्थित कर्मचारी ड्रग्जची शिपमेंट घेऊन त्याचे रिपॅक करायचे. यानंतर, अमेरिकेतील सर्व 50 राज्यांव्यतिरिक्त पॅनडा, इंग्लंड, आयर्लंड आणि जमैका सारख्या देशांमध्ये ड्रग्ज पोहोचवण्यात येत होते. युएस जस्टिस डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार बनमीतने अशा प्रकारे सुमारे 1.25 हजार कोटी रुपये कमावले होते.

Advertisement
Tags :

.