बेंगळुरात विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस
संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके : पार्टी आटोपून परतत होती घरी
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येची घृणास्पद घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री बेंगळूरमध्ये एका पदवीधर विद्यार्थिनीला रिक्षामधून निर्जनस्थळी नेऊन सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न उघडकीस आला आहे. सदर 20 वर्षीय विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थिनीकडून प्राथमिक माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथके तयार करून कृत्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत माहिती अशी की, एका खासगी महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारी तऊणी रात्रीच्या वेळी मैत्रिणींसोबत कोरमंगल येथील पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. मध्यरात्री पार्टी आटोपून घरी परतत असताना वाटेत मैत्रिणीच्या गाडीचा रिक्षाला धक्का बसल्याने रिक्षा चालकांनी वादावादी केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीसही आले होते. यावेळी सदर तरुणी लिफ्ट घेऊन एका दुचाकीवर बसून तेथून निघून गेली. यानंतर आणखी एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली. तेथून ती रिक्षाचा आधार घेत घराचा पत्ता देऊन दारूच्या नशेत रिक्षातच झोपी गेली. याचा फायदा घेत रिक्षाचालकाने तिला एचएसआर लेआऊटच्या निर्जन भागात नेऊन तिच्या मित्रांना बोलावून तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
तीव्र अस्वस्थ झालेल्या तऊणीने इमर्जन्सी नंबर म्हणून तिचे वडील आणि मित्राचे नंबर दिले. इमर्जन्सी नंबरवर कॉल गेल्यावर पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मैत्रिणीला फोन केला. दरम्यान, मित्र घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पीडितेची प्रकृती दयनीय होती. पीडितेचे कपडे फाडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पीडितेला ऊग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना दिली.
डॉक्टरांकडून माहिती
याची माहिती मिळताच एचएसआर लेआऊट पोलिसांनी तातडीने ऊग्णालयात धाव घेत डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच वादावादी झालेल्या तऊणीकडूनही प्राथमिक माहिती घेतली. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेचे जबाब घेण्यात आले असून ती बरी होत असल्याचे दक्षिण पूर्व विभागाच्या डीसीपी सारा फातिमा यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी दक्षिण पूर्व विभागातील 40 पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी धाव घेऊन माहिती घेतली.
वैद्यकीय तपासणी
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी, तऊणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला हे खरे आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून तिच्यावर अत्याचार झाला आहे की नाही हे वैद्यकीय तपासणीतून निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.