For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपमध्ये येऊ शकते हिमयुग

06:11 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
युरोपमध्ये येऊ शकते हिमयुग
Advertisement

अटलांटिक महासागराचा मुख्य सागरी प्रवाह जो युरोप आणि अनेक खंडांना उबदार ठेवत आहे, तो संपुष्टात येत आहे. म्हणजेच थंड होत आहे. या प्रकाराला आइसलँडने राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरविले आहे. हा प्रवाह थांबला तर पूर्ण युरोपमध्ये पुन्हा हिमयुग येऊ शकते, म्हणजे चहुकडे केवळ बर्फच बर्फ.

Advertisement

देशाच्या अस्तित्वासाठी हे धोकादायक आहे. सरकार आता सर्वात वाईट स्थितीसाठी योजना आखत आहे, कारण आइसलँड अत्यंत उत्तर ध्रुवावरच आहे, सर्वात वाईट प्रभाव आमच्या देशावरच पडणार असल्याचे उद्गार आइसलँडचे हवामान मंत्री जोहान पाल जोहानसन यांनी काढले आहेत.

 

अटलांटिक प्रवाह का महत्त्वपूर्ण

Advertisement

अटलांटिक मेरिडियनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन (एएमओसी) नावाचा हा प्रवाह गरम पाण्याला उष्णकटिबंधीय क्षेत्रातून आर्क्टिकच्या दिशेने नेतो. यामुळे युरोपमधील हिवाळा तीव्र राहत नाही. परंतु हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळत असून ग्रीनलँडमधील हिमाच्छादनमधून थंड पाणी समुद्रात मिसळले जात आहे. हे थंड पाणी प्रवाहासाठी अडथळे निर्माण करू शकते. जर एएमओसी संपुष्टात आला तर उत्तर युरोपमध्ये हिवाळ्यात तापमान खूपच खालावणार आहे. बर्फ आणि बर्फाळ वादळे वाढतील. हा प्रवाह यापूर्वीही पूर्णपणे थांबला होता, जवळपास 12 हजार वर्षांपूर्वी अखेरच्या हिमयुगापूर्वी हे घडले होते, असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

आइसलँडची चिंता

ही स्थिती आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका आहे. एखाद्या खास हवामान घटनेला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसमोर अस्तित्वासाठी धोका ठरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता सर्व मंत्रालये सतर्क असून उपाययोजना तयार करत आहेत. सरकार संशोधन, धोरणे आणि आपत्ती व्यवस्थापनावर काम करत असल्याचे मंत्री जोहानसन यांनी सांगितले. देशाची ऊर्जा आणि अन्न सुरक्षा, मूलभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय परिवहन धोक्यात येणार आहे. सागरी बर्फ जहाजांना रोखू शकतो. टोकाचे हवामान कृषी आणि मासेमारीला नुकसान पोहोचवू शकते, ही दोन्ही क्षेत्रे आमची अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेसाठी आवश्यक आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

जागतिक प्रभाव

एएमओसी संपुष्टात आल्यास उत्तर युरोपसह आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिकेच्या शेतकऱ्यांवर याचा प्रभाव पडणार आहे. पावसाचा पॅटर्न बिघडू शकतो. अंटार्क्टिकात उष्णता वाढू शकते. पुढील काही दशकांमध्ये घटना पूर्ण होतील, कारण जागतिक तापमान वाढत असल्याचा इशारा वैज्ञानिक देत आहेत. हे कधी घडेल यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होतोय, परंतु समाजावर प्रभावाविषयी कमी माहिती असल्याचे फिनलंडच्या हवामानशास्त्र संस्थेचे वैज्ञानिक एलेक्सी नुमेलिन यांनी सांगितले आहे. विज्ञान वेगाने बदलत असून वेळ कमी आहे, कारण टिपिंग पॉइंट नजीक येत असल्याचे वक्तव्य जर्मनीच्या पॉट्सडॅम इन्स्टीट्यूटचे स्टेफन राह्यमस्टॉर्फ यांनी केले आहे.

उत्तर युरोपमधील अन्य देशही सतर्क आहेत, आयर्लंडच्या हवामान विभागाने पंतप्रधान आणि संसदीय समितीला माहिती दिली आहे. नॉर्वेचे पर्यावरण मंत्रालय नव्या संशोधनाला प्रोत्साहन देत आहे. तर ब्रिटनने 81 मिलियन पौंडपेक्षा अधिक निधी संशोधनासाठी उपलब्ध केला आहे. नॉर्डिक कौन्सिलने ऑक्टोबरमध्ये 60 तज्ञांसोबत ‘नॉर्डिक टिपिंग वीक’ कार्यशाळा आयोजित केली.

Advertisement
Tags :

.