महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायली दुतावासाजवळ स्फोटसदृश घटना

06:18 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनएसजी-एनआयएकडून तपास : स्फोटानंतर इस्रायलकडून नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील चाणक्यपुरी भागात असलेल्या इस्रायली दुतावासाच्या मागे स्फोटसदृश आवाज आल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना इस्रायली दुतावासाजवळ एका ध्वजात गुंडाळलेले पत्र सापडले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयितही दिसत आहेत. नॅशनल सिक्मयुरिटी कौन्सिलने एक अॅडव्हायझरी जारी करत सतर्कता जारी केली आहे. भारतात आणि विशेषत: दिल्लीत राहणाऱ्या इस्रायलींना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीतील चाणक्मयपुरी येथील इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाप्रकरणी बुधवारी एनआयए सक्रिय झाली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. याशिवाय फॉरेन्सिक तज्ञांसह एनएसजीचे जवानही इस्रायली दुतावासात तपासासाठी पोहोचले आहेत. या स्फोटानंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांनी भारतातील त्यांच्या नागरिकांसाठी सूचनाही जारी केल्या आहेत. या अॅडव्हायझरीमध्ये नागरिकांना गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्या. कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती ताबडतोब पोलिसांना द्या. इस्रायली दुतावास किंवा इस्रायली वाणिज्य दुतावासाशी संपर्क साधून आवश्यक मदत घ्या व तक्रारही नोंदवू शकता, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. इस्रायली नागरिकांनी भारतात प्रवास करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपडेट केलेली माहिती तपासावी, असेही या अॅडव्हायझरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

स्फोटानंतर स्फोटके हवेत उडत असल्याने हा स्फोट केमिकलच्या स्फोटामुळे झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे फॉरेन्सिक टीमला कोणतीही स्फोटक वस्तू सापडली नाही. दिल्ली स्पेशल सेल, श्वानपथक आणि एनआयएचे अधिकारी इस्रायल दुतावासाबाहेर तपास करत आहेत. इस्रायल दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी 5.10 वाजता स्फोट झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

12 हून अधिक पथकांकडून तपास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या तपासासाठी 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्फोटाच्या ठिकाणाचा डंप डेटाही गोळा करण्यात आला आहे. तपास यंत्रणा सुमारे 5 हजार मोबाईल क्रमांकांची चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांची 12 हून अधिक पथके तपासात गुंतली आहेत.

Advertisement
Next Article