महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाला लाखोंचा गंडा: परदेशी कंपनीने कच्चा माल देतो, म्हणून फसविले

06:30 PM Jan 07, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कुपवाड प्रतिनिधी

Advertisement

डेन्मार्क देशातील एका कंपनीतील संशयिताने कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकाला कच्चा माल देतो, म्हणून गेल्या अडीच वर्षात ऑनलाईन संपर्काद्वारे पैसे उकळून तब्बल १४ लाख ६७ हजार ८९७ रुपयाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

कंपनीसाठी लागणारा 'पीव्हीसी रिग्रॅड' नावाचा कच्चा माल देतो, असे सांगून पैसे देवूनही माल न पाठविल्याने परदेशी कंपनीने फसविल्याची तक्रार संबंधित उद्योजकाने कुपवाड पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कुपवाड एमआयडीसीतील प्रकाश शांतीलाल शहा (रा.अंबाईनगर, काॅलेज काॅर्नर जवळ, सांगली) असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संशयित पाॅल राॅबसन (रा.जीजीपी, डेन्मार्क) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement
Tags :
entrepreneurkupwadMIDC
Next Article