For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल

11:08 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल

चेन्नई पोलिस तपासासाठी गोव्यात : गुरुवारी मडगावात काहीजणांचा तपास

Advertisement

मडगाव : तामिळनाडू येथील काही शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गोव्यातून पाठविण्यात आल्याने, त्याचा तपास करण्यासाठी चेन्नईचे पोलिस गोव्यात दाखल झाले असून त्यांनी तपासकामाला सुरुवात केली आहे. काल गुरुवारी या पथकाने मडगावात तपासकाम केले. गोव्यातील एकूण पाच व्यक्तींची नावे या पोलिसपथकाकडे असून त्यांनी यापैकी काहीजणांच्या चौकशीला काल प्रारंभ केला आहे. चेन्नईच्या पोलिसपथकात  पोलिस निरीक्षकासह सायबर क्राईमचे चार पोलिस तपासकार्यात गुंतले आहेत. ज्यांच्याकडून शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ई-मेल गेल्याचा संशय आहे, त्यांच्याकडून मोबाईल, संगणक इत्यादीची तपासणी करण्यात आली. गोव्यातील पाच व्यक्तीची नावे ई-मेल पाठविणाऱ्यांमध्ये असल्याने तपासकामाचा एक भाग म्हणून हे पथक गोव्यात दाखल झाले आहे. मडगावसहीत गोव्यात चार-पाच ठिकाणी भेट देऊन तपास करीत आहेत. बॉम्बस्फोट घडवून तामिळनाडूतील शाळा उडवून देणारा ई-मेल गोव्यातून पाठविला असल्याने गोव्यातील पोलिस यंत्रणाही गोंधळून गेली आहे. गोव्यात आजपर्यंत असा प्रकार कधीच घडलेला नाही. मात्र, गोव्यातील व्यक्तांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून प्रगत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अन्य कुणी ई-मेल पाठविला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी गोव्यासहित देशातील अन्य राज्यांतही तपास सुरू असल्याची माहिती चेन्नई पोलिसांनी दिली. अन्य राज्यातूनही अशाच प्रकारचे ई-मेल तामिळनाडूतील शाळांना आल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांची माहिती गोळा केल्यानंतरच आम्ही ई-मेल पाठविणाऱ्याच्या मुळापर्यंत जाऊ शकतो, असेही या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. शाळा उडवून देणारा ई-मेल फेब्रुवारी 2024 मध्ये शाळांना मिळाला होता.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.