हातात नंगी तलवार घेऊन मासेमारी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न
जत पुर्व भागातील दोड्डनाला तलावरील प्रकार : भर दिवसा तलवारीचा नंगानाच
उमदी/वार्ताहर
उटगी ता.जत येथील येथील दोद्दनाला तलावात पाणी आल्याने ग्रामस्थासह शेतकरी मासेमारी करण्यासाठी गेले असता मासेमारी चा मक्ता घेतलेल्या ठेकेदारांकडून गावगुंडांचा वापर करत मासेमारी करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांवर नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उटगी व परिसरातील नागरिकांमध्ये भिंती पसरली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दोड्डनाला तलावामध्ये पुरेसा पाऊस नसल्याने मासेमारीसाठी नागरिक कमी प्रमाणात जात होते. तसेच या दोड्डनाला तलावामध्ये दरवर्षी मासेमारी करण्यासाठी एका ठेकेदारांला मक्ता दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला तालुक्यातील एका मक्तेदाराला ठेका दिला जात आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने जनु काय तलाव हा आपल्या मालकीचाच आहे असे समजून तलावाजवळ मासेमारी करण्यासाठी आलेल्या नागरिकांवरती नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचा मक्ता रद्द करुन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.