For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला
Advertisement

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान : सुरक्षा दलाच्या संयुक्त मोहिमेला मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था /कुपवाडा

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गुऊवारी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला. या कारवाईदरम्यान केरन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सकाळी सुरू झालेला हा संघर्ष सायंकाळपर्यंत सुरूच होता. केरन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात संयुक्त शोधमोहीम राबवली. केरन सेक्टर नियंत्रण रेषेजवळ आहे. या सेक्टरमधून दहशतवादी सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, ह्यावेळी लष्कराच्या जवानांनी दोघांना ठार करत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. दहशतवाद्यांनी प्रथम सुरक्षा जवानांवर गोळीबार केल्यानंतर दोघांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 6आरआर आणि कुपवाडा पोलिसांसह सुरक्षा दलांनी ही मोहीम राबविल्यानंतर संघर्ष सुरू झाला.

Advertisement

गेल्या दोन आठवड्यात चकमकीची चौथी घटना

गेल्या दोन आठवड्यात जम्मू-काश्मीर सुरक्षा दलांशी चकमकीची ही चौथी घटना आहे. 9 जुलै रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, मात्र दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. दोडामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी डोडामध्ये ओव्हर-ग्राउंड कामगारांवर कारवाई सुरू केली. दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. त्यानंतर आता कुपवाडामध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून दोघांचा खात्मा केला आहे.

Advertisement
Tags :

.