महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिरुपती-श्रीशैल मंदिराच्या धर्तीवर सौंदत्तीचा विकास करण्याचा प्रयत्न

10:09 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची यल्लम्मा देवस्थानला भेट

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला शनिवारी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी खासदार झाल्यापासून पहिल्यांदाच डोंगराला भेट देऊन आपल्या कुटुंबासमवेत श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यल्लम्मा मंदिराचा तिरूपती व श्रीशैलसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली. यल्लम्मा आदीशक्तीचे हे एक प्रमुख पर्यटन आणि धार्मिक ठिकाण आहे.

या ठिकाणी लाखो भाविक येत असल्यामुळे माजी खासदार मंगला अंगडी यांनी केंद्र सरकारच्यावतीने 11 कोटीचा निधी मंजूर केला. त्या अनुदान अंतर्गत कांही कामे करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत मंदिर प्रशासनाला आवश्यक कामांची यादी देण्याबाबत कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. यल्लम्मा डोंगरापर्यंत रेल्वेमार्गाबाबत मी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. यावेळी मंदिराच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक अध्यक्ष बसय्या हिरेमठ, देवस्थानचे सीईओ एसबीपी महेश, रत्ना मामनी, वाय. वाय. काळप्पनावरसह कर्मचारी व  पुजारीवर्ग उपस्थित होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article