महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

7 ऑक्टोबरसारख्या हल्ल्याचे होते प्लॅनिंग

07:52 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलने उधळला हिजबुल्लाहचा कट : मुख्य सूत्रधाराचा खात्मा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता. यात हमासकडून 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या नरसंहारासारखा कट रचण्यात आला होता. यावेळी उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहचे दहशतवादी हे हमासप्रमाणे घुसखोरी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये होते. परंतु योग्यवेळी इस्रायलला या कटाचा सुगावा लागला  आणि यानंतर इस्रायलच्या सैन्याने या कटात सामील  हिजबुल्लाह कमांडर्सना यमसदनी पाठविले आहे.

या कटाच्या अंतर्गत हिजबुल्लह इस्रायलवर मोठा हल्ला करणार होता. गॅलिली भागातील लोक या हल्ल्याचे लक्ष्य ठरणार होते. हमासने 7 ऑक्टोबर रोजी ज्याप्रकारे इस्रायलमध्ये घुसून ज्यूंची हत्या केली होती, त्याचप्रकारे हिजबुल्लाहचे दहशतवादी कत्तल घडवून आणणार होते. या हल्ल्याकरता पूर्ण प्लॅनिंग वरण्यात आले होते. तसेच हल्ला घडवून आणण्यासाठी शुक्रवारी बैठक घेत याची जबाबदारी रादवां फोर्सला सोपविण्यात आली होती अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सचे रियर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी दिली आहे.

या कटाचा सूत्रधार हिजबुल्लाह कमांडर इब्राहिम अकील होता. अकील हा इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. अकीलवर बैरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणत 241 अमेरिकन सैनिकांची हत्या केल्याचाही आरोप होता. हमासने दक्षिण इस्रायलच्या सीमावर्ती गावांना लक्ष्य केले होते. तर हिजबुल्लाहकडून उत्तर इस्रायलच्या गावांना लक्ष्य करण्यात येणार होते. यातील एक गाव लेबनॉनच्या सीमेपासून केवळ 250 मीटर अंतरावर आहे. तर दुसरे मेतुला गाव 350 मीटर अंतरावर आहे.

हिजबुल्लाहचे दहशतवादी मोठ्या संख्येत इस्रायलच्या सीमेत दाखल झाले असते तर या गावांपर्यंत काही मिनिटांमध्ये पोहोचले असते. काही मीटर अंतरावरील हा धोका ओळखत इस्रायलने हल्ल्याचे प्लॅनिंग करणाऱ्या कमांडर्सना अचूक बॉम्बवर्षावाने संपविले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article