For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनमधील उद्रेकाचे गूढ अद्याप कायम

06:47 AM Jan 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
चीनमधील उद्रेकाचे गूढ अद्याप कायम
Advertisement

रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी, अनेक अर्भके सलाईनवर

Advertisement

वृत्तसंस्था / बीजिंग

चीनमध्ये सध्या एचएमपीव्ही नामक विषाणूचा उद्रेक झाला आहे, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या देशाच्या विविध शहरांमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. असंख्य बालके आणि अर्भकांनाही एचएमपीव्ही या संसर्गजन्य विकाराची लागण झाली असून त्यांच्यापैकी अनेकांना सलाईनवर ठेवण्यात आले आहे. चीनमधून हा विकार जगभरात पसरण्यची शक्यता आहे.

Advertisement

तथापि, चीनविषयी माहिती असलेल्या अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार एचएमपीव्ही या संसर्गजन्य विषाणूहा उद्रेक चीनमध्ये झाला असला तरी अद्याप तो अल्प प्रमाणात आहे. आज चीनमध्ये रुग्णालयांमध्ये जी गर्दी दिसून येते, ती केवळ या विषाणूची लागण झाल्यामुळे नाही. कोणताही लहान आजार झाला, तरी चीनी नागरीक त्वरीत रुग्णालयात दाखल होण्याचा प्राधान्य देतात. त्यामुळे नेहमीच तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते. यावेळी एचएमपीव्ही या विषाणूची चर्चा जगभर होत आहे. त्यामुळे चीनमधल्या रुग्णालयांमध्ये दिसत असलेल्या गर्दीचा संबंध या विकाराशी जोडला गेला आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही.

कोरोनाच्या आठवणी जाग्या

सध्या एचएमपीव्ही या विषाणूची जगभरात चर्चा होत आहे. त्यामुळे 2020 ते 2022 या काळात साऱ्या जगाला ग्रासलेल्या कोरोनाच्या उद्रेकाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कोरोनाचाही प्रारंभ प्रमुख्याने चीनमध्येच झाला होता आणि तेथून तो भारतासह जगभरात पसरला. आता या नव्या विषाणूमुळे जगात चिंता वाढू लागली आहे. कारण या विषाणूमुळे चीनमध्येही हाहाकार माजविला आहे.

चीनमधील मानसिकता

इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ या नियतकालिकामध्ये चीनविषयक एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. चीनमधील सार्वजनिक आरोग्यसेवेची गुणवत्ता अत्यंत असमाधानकारक आहे, असे या अभ्यासाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. चीन सरकार सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असते. तरीही तेथील सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणावी तशी व्यापक आणि सुधारलेली नाही. त्यामुळे जी रुग्णालये उपलब्ध आहेत, त्यांच्यात रुग्णांची गर्दी नेहमीच दिसून येते. शिवाय, चीनमधील नागरीकांची छोट्या आजारांसाठीही सलाईन लावण्याची मागणी असते. त्यामुळे तेथे सलाईन लावलेली बालके नेहमीच रुग्णालयात मोठ्या संख्येने दिसून येतात. आताही तेथील रुग्णालयांचे व्हिडीओ प्रसिद्ध होत आहेत. तथापि, त्यांच्यामुळे फार चिंता करण्याचे कारण नाही, असा अहवालाचा निष्कर्ष आहे.

फॅमिली डॉक्टरांची कमतरता

चीनमध्ये सध्या फॅमिली डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. याचे कारण खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय केंद्र स्थापन करायचे असेल तर रुग्ण पुरेशा संख्येने मिळतीलच या शाश्वती नाही. परिणामी, डॉक्टरांची संख्याही कमी होत आहे.

काय दक्षता घ्यावी लागणार...

सध्या जगात एचएमपीव्हीची व्याप्ती अद्याप चिंताजनक स्थितीत पोहचलेली नाही. जे रुग्ण आढळून येत आहेत, तेव्हढे सर्वसामान्य परिस्थितीतही आढळून येतात. त्यामुळे सध्या तरी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तथापि, प्रत्येकाने स्वसंरक्षणासाठी उपाययोजना करणे हे आगत्याचे आहे. एचएमपीव्ही हा विकार कोरोनासारखाच आहे. त्यामुळे तो होण्यापूर्वीच दक्षता बाळगणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अनेक डॉक्टर्स आणि आरोग्यतज्ञांनी केलेले आहे. हातांची स्वच्छता सुनिश्चित करणे, मास्कचा उपयोग सार्वजनिक स्थानी करणे, तसेच ज्याला फ्ल्यूची लक्षणे दिसत आहेत, त्याची त्वरित तपासणी करुन घेणे आणि त्याला विलगीकरणात ठेवणे, हे उपाय करावे लागणार आहेत, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.