महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेशात भाजपकडून वरिष्ठ नेत्यांची फौज

05:35 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्तरी ओलांडलेल्या 14 नेत्यांना उमेदवार : 80 वर्षे वयाच्या नेत्याला तिकीट

Advertisement

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवसांनी मतदान होणार आहे. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजप पूर्ण शक्तिनिशी प्रचार करत आहे. याचमुळे भाजपने राज्यात स्वत:च्या राष्ट्रीय नेत्यांना मैदानात उतरविले आहे. मध्यप्रदेशात भाजपने तीन केंद्रीय मंत्री आणि एक पक्ष महासचिवासमवेत 7 खासदारांना  विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

या निवडणुकीत विजय मिळावा म्हणून भाजपने वेगळी रणनीति अवलंबिली आहे. पक्षाने स्वत:च्या 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या रणनीतित बदल केला आहे. या निवडणुकीत पक्षाने 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 14 उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. यातील सर्वाधिक वयाचा उमेदवार हा 80 वर्षांचा आहे. तर काँग्रेसने 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 9 नेत्यांना संधी दिली आहे.

कर्नाटकाच्या पराभवातून धडा

भाजपने अधिक वयाच्या नेत्यांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा कर्नाटक निवडणुकीतील पराभवामुळे घेतला आहे. कर्नाटक निवडणुकीत पक्षनेतृत्वाने स्वत:च्या वरिष्ठ नेत्यांपासून अंतर राखले होते. यात 67 वर्षीय माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, 74 वर्षीय माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वराप्पा सामील होते. त्यांच्याऐवजी पक्षाने युवा उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते.

नागौदमध्ये 80 वर्षीय उमेदवार

मध्यप्रदेशात भाजपने 80 वर्षीय माजी मंत्री नागेंद्र सिंह यांना नागौद मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तर 79 वर्षीय नेत्याला रीवा जिल्ह्यातील गुढ मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. गुढ मतदारसंघात आम आदमी पक्षाने अमेरिकेतील नोकरी सोडून आलेल्या 25 वर्षीय प्रखर प्रताप सिंहला उमेदवारी दिली आहे.

या वृद्ध नेत्यांना मिळाले तिकीट

याचबरोबर भाजपने दमोह येथे 76 वर्षीय जयंत मलैया, अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी मतदारसंघात 75 वर्षीय जगन्नाथ सिंह रघुवंशी, नर्मदापुरम जिल्ह्dयातील होशंगाबाद येथे 73 वर्षीय सीताशरण शर्मा, अनुपपूर मतदारसंघात 73 वर्षीय बिसाहूलाल सिंह, ग्वाल्हेर पूर्व मतदारसंघात 73 वर्षीय माया सिंह यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.

या नेत्यांचाही समावेश

राजगढ जिल्ह्dयातील खिलचीपूर मतदारसंघात हजारीलाल दांगी, नर्मदापुरच्या सिवनी-मालवा येथे प्रेमशंकर वर्मा, शहडोल जिल्ह्dयातील जैतपूर मतदारसंघात जयसिंह मरावी, रेहली येथे गोपाळ भार्गव, जबलपूरमधील पाटन मतदारसंघात अजय विश्नोई, श्योपूर मतदारसंघात दुर्गालाल विजय आणि बालाघाट मतदारर्सघात गौरी शंकर बिसेन हे भाजपचे उमेदवार असून या सर्वांचे वय 70 वर्षांपेक्षा अधिक आहे.

मागील वेळी नाकारली होती उमेदवारी

2016 मध्ये सरताज सिंह यांना (तेव्हा 76 वर्षे) कथित स्वरुपात वय अधिक असल्याने शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. तर सरताज सिंह यांना 2018 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते. मागील निवडणुकीत तत्कालीन मंत्री कुसुम मेहेंदळे यांना (आता 80 वर्षे) ही उमेदवारी नाकारण्यात आली होती.

काँग्रेसकडून वरिष्ठांना संधी

काँग्रेसने 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 9 उमेदवारांना तिकीट दिले आहे. यातील सर्वात वृद्ध उमेदवार 77 वर्षांचा आहे. काँग्रेसने नीमच जिल्ह्यातील मनासा येथे 77 वर्षीय नरेंद्र नाहटा, छिंदवाडा येथे 76 वर्षीय माजी मुख्यमंत्री कमलनाथ, बदनावर येथे 73 वर्षीय भंवर सिंह शेखावत, अमरपाटन येथे 73 वर्षीय राजेंद्र कुमार सिंह, होशंगाबाद येथे 73 वर्षीय गिरिजाशंकर शर्मा (73 वर्षे) आणि गोविंद यांना मैदानात उतरविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article