For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक परिसरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन

10:27 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक परिसरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन
Advertisement

पोलीस, प्रशासन-ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा

Advertisement

बेळगाव : तालुक्यात गणेशोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुऊवात झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून तालुक्यातील प्रत्येक मंडळाला विविध सूचना करण्यात येत आहेत. याचप्रमाणे कंग्राळी बुद्रुक परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन आणि ग्रा.पं. सदस्य यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले आहे. काही बुद्रुक ग्रामपंचायत सदस्यांनी काकती पोलीस स्थानकातील सीपीआय रमेश सिंगी यांची भेट घेतली. यावेळी गणेशोत्सव संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कंग्राळी बुद्रुक या गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात. या गावात सुमारे 12 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा नागरिकांनी हा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन सीपीआय रमेश सिंगी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना केले. ही चर्चा व भेट ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी पंचायतीचे हंगामी अध्यक्ष सदापा राजकट्टी, न्यायदान कमिटी अध्यक्ष सुरेश राठोड, दादासाहेब भदरगडे, तानाजी विठ्ठल पाटील, प्रशांत पवार, कल्लाप्पा अष्टेकर आदी उपस्थित होते.त्यानंतर सीपीआय रमेश सिंगी यांना पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. व आपण आपल्या गावामध्ये गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अनिल पावशे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.